“पीएमपी’ने घेतला मेट्रोच्या मजुराचा बळी

पिंपरी – पीएमपीएमएल बसने बीआरटी रस्ता ओलांडणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या मजुराला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने पीएमपीएमएलच्या बसची तोडफोड केली. गुरुवारी (दि. 26) रात्री साडेदहा वाजता नाशिक फाटा येथे हा अपघात झाला.

साहेद आलम (वय-20) असे या मयत तरुणाचे नाव असून तो पुणे मेट्रो प्रकल्पात मजूर म्हणून काम करत होता. या प्रकरणी पोलिसांनी पीएमपीएमएल बसचा चालक शशिकांत वासाळे याला ताब्यात घेतले आहे.

हिंजवडी ते भोसरी मार्गावर धावणारी पीएमपीएमएलची बस (एमएच 12, के क्‍यू 0936) नाशिक फाटा पुलाजवळ येत असताना हा अपघात झाला. साहेद बीआरटी रस्ता ओलांडत होता. त्यावेळी बसने त्याला धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.त्याला उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर तेथे उपस्थित असणाऱ्या संतप्त जमावाने बसची तोडफोड केली. बस चालक शशीकांत बाळकृष्ण वासाळे याने तेथून पळ काढला आणि थेट सांगवी पोलीस ठाणे गाठले.
मयत साहेद आलम लेबर कॅम्प काशीद पार्क येथे राहत होता. तो मुळचा पश्‍चिम बंगालचा आहे. साहेद त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी मेट्रो प्रकल्पात मजूर म्हणून काम करत होता. त्याच्या मागे आई, वडील आणि चार अविवाहित बहिणी असा परिवार आहे. घरातील कर्ता तरुण गेल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)