पीएमपीत गोंधळ घालणाऱ्या तरुणावर गुन्हा

भोसरी – पीएमपीएमएल बसमध्ये चढून बस चालक आणि वाहक यांच्याशी हुज्जत घालत बसची काच फोडून एका वृद्ध महिलेला जखमी केल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार भोसरी मंडई जवळ घडला. या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीएमपीएमएल बस चालक अजय मासाळ (वय-24, रा. आळंदी, पुणे) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विशाल वैजनाथ कांबळे (वय-20, रा. निगडी, पुणे) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हे पीएमपीएमएल मध्ये बस चालक म्हणून नोकरीस आहेत. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भोसरी मंडई येथून जात असताना अचानक विशाल बसमध्ये जबरदस्तीने चढला. त्याने   चालक आणि वाहक यांना शिवीगाळ गेली. बसमधून उतरून रस्त्यावरील वीट बसवर फेकून बसची काच फोडली. यामध्ये बसमधील एक वृद्ध महिला जखमी झाली. यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)