पीएमपीतील निवृत्त अधिकाऱ्यांना मुदतवाढ?

PMPML, Pune

 तीन निवृत्त अधिकाऱ्यांची करार मुदत संपली

पुणे – पीएमपीतील महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या एसटी महामंडळातील तीन निवृत्त अधिकाऱ्यांची मुदत (दि.31) रोजी संपली आहे. वर्षभरापासून त्यांची करार पद्धतीवर नेमणूक करण्यात आली होती. यामुळे कार्यकाळ पूर्ण होत असून त्यांना मुदतवाढ मिळणार का? याबाबत पीएमपी अधिकाऱ्यांमध्ये तर्कवितर्क सुरू आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या कार्यकाळात पीएमपीचा नवीन आस्थापना आराखडा तयार केला होता. त्यानुसार त्यांनी चार वरिष्ठ पदांसाठी एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्‍ती केली. त्यांच्यावर वाहतूक व्यवस्थापक, सहव्यवस्थापक आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपला असून त्यांना मुदतवाढ देण्यात येणार की नाही, याबाबत प्रशासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे.

कुठे विरोध तर कुठे समर्थन
मुंढे यांनी मुद्दामहून एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना नियुक्‍त केले होते. त्यांच्या कामाचा फायदा पीएमपीला व्हावा हा उद्देश यामागे होता. मात्र, वर्षभरात घडलेल्या घटना, उत्पन्न, संचलन या बाबींकडे पाहता या अधिकाऱ्यांबाबत कर्मचाऱ्यांच्या मनात कही खूशी कही गम अशी परिस्थिती आहे. काही कर्मचाऱ्यांकडून त्यांना विरोध, तर काही कर्मचारी समर्थन करत आहेत. यामुळे त्यांच्याबाबत काय निर्णय होतो हे पाहणे गरजेचे आहे.

अध्यक्षांच्या हाती निर्णय
पीएमपीत कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यांना मुदतवाढ द्यायची, की नाही याबाबत पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. यासाठी त्यांनी वर्षभर केलेल्या कामाचा परफॉर्मन्स तपासला जाण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, चार अधिकाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्याची मुदत दोन महिन्यांपूर्वींच संपली. यावेळी त्यांना मुदतवाढ देण्यात न आल्याने या तीन अधिकाऱ्यांबाबत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)