पीएमपीतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निरोप

एक वर्षाचा करार संपल्याने निर्णय : नवीन अधिकाऱ्यांची नियुक्‍ती

पुणे – पीएमपीतील महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या एसटी महामंडळातील तीन निवृत्त अधिकाऱ्यांना सोमवारी निरोप देण्यात आला. वर्षभरापासून त्यांची करार पध्दतीवर नेमणूक करण्यात आली होती. मात्र, सोमवारी (दि.31) त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला.

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या कार्यकाळात पीएमपीचा नवीन आस्थापना आराखडा तयार केला होता. त्यानुसार त्यांनी चार वरिष्ठ पदांसाठी एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती केली. यानुसार वाहतूक व्यवस्थापक पदावर दत्तात्रय माने, महाव्यवस्थापकपदी विलास बांदल, कार्मिक अधिकारी म्हणून संभाजी पाटील तर देखभाल दुरुस्ती विभागाची जबाबदारी जाधव यांच्यावर सोपविण्यात आली होती. यातील जाधव यांचा कार्यकाळ दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाल्याने त्यांना तेव्हा निरोप देण्यात आला होता. उर्वरीत तीन अधिकाऱ्यांना सोमवारी प्रशासनाकडून निरोप देण्यात आला. यावेळी पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे यांच्यासह पीएमपीतील अधिकारी उपस्थित होते.

…वाहतूक व्यवस्थापकपदी गवळी
पीएमपीतील वाहतूक व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या दत्तात्रय माने यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला. यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पीएमपीतील वरिष्ठ अधिकारी सुनील गवळी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर, कार्मिक अधिकारी म्हणून व्ही. डी. परदेशी यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)