पीएमपीच्या 400 बसेस येणार; 100 बाद होणार

पीएमपीच्या नवीन खरेदीद्वारे महसूल वाढीचे प्रयत्न

पुणे – “सीएनजी’ वर धावणाऱ्या नवीन 400 बसेस जानेवारीत पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. मात्र, या बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर आरटीओच्या नियमानुसार शंभर जुन्या बसेस बाद करण्यात येणार आहेत. त्यामुळे या बसेसची संख्या आणखी कमी होणार आहे.

पीएमपी बसेसच्या माध्यमातून किमान बारा ते तेरा लाख प्रवासी प्रवास करतात. त्याद्वारे प्रशासनाला दररोज किमान दीड ते पावणेदोन कोटी रुपयांचा महसूल मिळत असतो. सणासुदीच्या काळात हाच महसूल दोन कोटी रुपयांच्याही पुढे जातो. पण, बसेसची संख्या मर्यादित असल्याने सेवा पुरविताना अडचण येत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने खासगी ठेकेदारांकडून साडेसहाशे बसेस भाडेतत्वावर घेतल्या आहेत. पण, द्याव्या लागणाऱ्या भाड्यापोटी आर्थिक फटका बसत आहे.

त्यामुळे स्वत:च्या मालकीच्या बसेस घेण्यासाठी आर्थिक सहकार्य करावे, असा प्रस्ताव पीएमपीने दोन्ही महापालिकांना देण्यात आला होता. त्यासाठी सीएनजीवरील चारशे बसेस आणि पाचशे इलेक्‍ट्रिकल बसेसचा प्रस्ताव तयार करुन देण्यात आला होता. या प्रस्तावावर विचार केल्यानंतर दोन्ही महापालिकांनी सीएनजीवरील चारशे बसेस खरेदी करण्यासाठी निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील टप्प्यात इलेक्‍ट्रिकलवरील बसेसच्या खरेदीसाठीही निधी देण्यास महापालिका प्रशासनांनी मान्यता दिली आहे.

दोन्ही महापालिकांनी निधी देण्याची तयारी दर्शविल्यानंतर आणि संचालक मंडळाने मान्यता दिल्यानंतर संबंधित कंपनीच्या वतीने या बसेसच्या बांधणीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या बसेस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिली.

सध्या बसेसचे मार्ग आणि फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत आहे. महसूल वाढविण्यावर सध्या सर्वाधिक भर देण्यात येत आहे. नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर सध्याच्या महसुलात दररोज किमान तीस ते चाळीस लाखांनी वाढ होणार आहे.
– नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)