“पीएमपीच्या’ बदली कर्मचाऱ्यांना “स्टेअरिंग’ मिळेना

PMPML, Pune

विष्णू सानप
पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवणारी पीएमपीएल आहे. मात्र सध्या “पीएमपी’ला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. नेहरुनगर पीएमपी आगारातील ब्रेकडाऊन होणाऱ्या गाड्यांची संख्या दिवसें-दिवस वाढतच चालली असून त्यात सुधारणा होताना दिसत नाही. यामुळे कंत्राटी चालक व वाहक यांना पहाटे तीन वाजल्यापासून आगारात येवून सुद्धा गाड्या मिळत नाहीत. त्यामुळे कामगारांना दिवसभर आगारात थांबून रिकाम्या हाताने विनापगार घरी जावे लागत आहे.

नेहरुनगर पीएमपी आगारात एकूण 137 पीएमपीच्या मालकीच्या गाड्या आणि काही भाडेकरारावरील गाड्या मिळून 160 पर्यंत आकडा जात असला तरी एवढ्या गाड्या फक्त नावालाच आहेत. नेहरुनगर आगारात 50 ते 60 गाड्या धुळखात आगारातच आहेत. तर मार्गावर धावणाऱ्या गाड्यांपैकी सुमारे 25 ते 30 गाड्या दररोज “ब्रेकडाऊन’ होत आहेत. यामुळे बदली कर्मचाऱ्यांना गाड्या मिळत नसून त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. नेहरुनगर आगारात दररोज सुमारे 40 ते 45 बदली कर्मचाऱ्यांना काम मिळत नसल्याचा दावा या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गाड्या मिळाव्या म्हणून आम्ही पहाटेपासून आगारात रांगा लावत असतो. अनेकवेळ दिवसभर आगारात थांबून सुद्धा गाडी मिळत नाही. त्यामुळे रिकाम्या हाताने विनावेतन घरी जावे लागत असून कुटूंब सांभाळणे कठीण झाले आहे. आगारात जवळपास निम्या बस नादुरुस्त असून रस्त्यातच बंद पडणाऱ्या गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, अशी माहिती कंत्राटी चालक व वाहकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

सुट्टी घेतल्यास कर्मचाऱ्यांना दंड
दररोज पहाटे 3 वाजल्यापासून रांगा लावून काम मिळवणाऱ्या चालक व वाहकांना जर कुठल्या दिवशी महत्वाच्या कामासाठी कामावर आला नाही तर त्या कामगाराकडून 100 रुपये ते 1 हजार रुपयापर्यंत दंड वसूल करण्यात येतो. चालक, वाहक आगारात आल्यावर गाड्या दुरुस्त करुन चालक, वाहकास दिल्या जातात. गाड्या दुरुस्त होईपर्यंत कर्मचाऱ्यांना दोन-तीन तास आगारात ताटकळत बसावे लागते तर आठ तास ड्युटी पुर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना जास्त वेळपर्यंत थांबावे लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)