पीएमपीच्या चिल्लर रकमेचा प्रश्‍न जैसे थे

महिन्यानंतरही तोडगा नाही : 20 लाखांची चिल्लर जमा

पुणे – पीएमपीच्या दैनंदिन तिकीट विक्रीतून जमा होणारी चिल्लर रक्‍कम स्वीकारण्यास सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने नकार दिला असून 4 ऑक्‍टोबरपासून रक्‍कम घेणे बॅंकेने थांबवले आहे. यामुळे गेल्या महिन्याभरात पीएमपीकडे 20 लाख रुपयांच्या चिल्लर पैशांचा साठा जमा झाला आहे. महिन्याभरानंतरही ही परिस्थिती कायम असून अद्याप तोडगा निघू शकला नाही.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीकडे दैनंदिन जवळपास दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर रोज जमा होते. ही रक्‍कम पुणे कॅम्प येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखेत जमा केली जाते. मात्र, बॅंकेने दि.4 ऑक्‍टोबरपासून ही चिल्लर स्वीकारण्यास नकार दिला आहे. विशिष्ट मर्यादेपर्यंत रक्‍कम स्वीकारली जाणार असल्याचे बॅंकेकडून सांगितले जात आहे. यामुळे महिन्याभरापासून पीएमपीच्या आगारात तब्बल 20 ते 21 लाख रुपये चिल्लर जमा झाली असल्याचे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

पीएमपी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असून त्यांच्याकडे जमा होणारी रक्‍कम ही लोकांची आहे. यामुळे बॅंकेने ती स्वीकारावी यासाठी प्रशासनाने बॅंकेशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, बॅंकेने रिझर्व्ह बॅंकेचा हवाला देत ही रक्‍कम घेणार नसल्याचे सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून रिझर्व्ह बॅंकेलाही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात पीएमपीच्या मुख्य कार्यालयात पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे आणि बॅंक अधिकारी यांच्यात दोन ते तीन वेळा बैठक झाली. यावेळी दोघांमध्येही सकारात्मक चर्चा झाली असून बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आठवडाभरात तोडगा?
चिल्लर पैशांमध्ये 10 रुपयांच्या डॉलरची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या महिन्याभरात 20 लाख रुपये डेपोस्तरावर साचले असल्याने प्रशासनालाही ते सांभाळणे अवघड जात आहे. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेशी पत्रव्यवहार करण्यात आला असून येत्या आठ दिवसांत यावर तोडगा निघण्याची शक्‍यता, पीएमपीतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)