पीएमपीच्या एसी बसचे भाडे कमी

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मंजुरी : सामान्य प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा

पुणे – प्रवासी संख्येअभावी तोट्यात चालेल्या एसी बसेसचे भाडे कमी करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला होता. यासंदर्भात प्रस्ताव तयार करून साधारण तीन महिन्यांपुर्वी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे तो मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. नुकतेच या प्रस्तावाला मिळाली असून ताफ्यातील एसी बसेसचे भाडे कमी झाले आहे.

-Ads-

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली 29 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते उपस्थित होत्या. प्रवाशांना वातानुकूलीत प्रवास करता यावा यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाची शहरातील काही मार्गांवर एसी बससेवा सुरू आहे. जवळपास 10 एसी बसेसच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाते. मात्र, एसी बस असल्याने त्याचे तिकीटदर जास्त आहे. यामुळे सामान्य प्रवाशांकडून याकडे पाठ केली जात होती. पर्यायाने प्रवासी संख्या कमी होऊन उत्पन्नावर परिणाम होतो. गेल्या काही दिवसांपासून ही सेवा तोट्यात चालल्याने भाडे कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठीचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्याला बैठकीत मंजुरी देण्यात आली.

3 मार्गांवर सेवा
10 पैकी 2 बसेसच्या माध्यमातून पुणे दर्शन सेवा दिली जाते; तर उर्वरीत 8 बसेस शहरातील जास्त उत्पन्न देणाऱ्या प्रमुख 3 मार्गांवर सोडल्या जातात. यानुसार हिंजवडी ते पुणे एअरपोर्ट, कात्रज ते भक्ती शक्ती चौक (निगडी) आणि हडपसर ते भक्ती शक्ती चौक (निगडी) या मार्गावर एसी बसची सेवा पुरवली जाते. मात्र, यासाठी आकारले जाणारे भाडे जास्त असल्याने सामान्य प्रवाशांकडून एसी बसचा वापर केला जात नाही. एसी बसच्या तुलनेत साध्या बसचे कात्रज ते निगडी दरम्यान 35 रुपये तिकीट आहे. यामुळे एसी बसचे तिकीट सामान्य प्रवाशाला परवडत नसल्याने असे प्रवासी एसी बसने प्रवास करणे टाळतात. याच कारणामुळे हा निर्णय घेतला असून आता स्वस्तात प्रवास करता येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)