पीएमपीच्या आयटीएमएस यंत्रणेस “स्कॉच 2017′ पुरस्कार

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.13 – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) स्मार्ट शहरी वाहतूक सेवेअंतर्गत असलेल्या इंन्टिलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमला (आयटीएमएस) दिल्ली येथील स्कॉच ग्रुपकडून “स्कॉच’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तर राजस्थान सरकारने आयोजित केलेल्या स्मार्टसिटी समिटमध्येही पीएमपीच्या आयटीएमएस कार्यप्रणालीबद्दल विशेष पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. दोन महिन्यांपुर्वी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी आयटीएमएस यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. त्यात महामंडळाचे वाहतूक नियोजन व नियंत्रणामध्ये अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच, संचलन नियंत्रण, ई-तिकिट कार्यप्रणाली, प्रवासी तक्रार निवारण केंद्र, पीएमपी ई-कनेक्‍ट ऍप असे काही अद्ययावत प्रयोग राबविण्यात आले. त्यामुळे महामंडळाच्या सेवेत काही प्रमाणात सकारात्मक बदल घडून प्रवासी केंद्रीत बससेवा होण्यास मदत झाली आहे. याची दखल घेवून महामंडळाच्या आयटीएमएस कार्यप्रणालीस विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात आलेले आहे, असे पीएमपी प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)