“पीएमपी’चे 73 कर्मचारी महापालिका सेवेत

प्रभाग, क्रीडा विभाग, स्वच्छ सर्व्हेक्षणचे काम पाहणार

पिंपरी- पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) व्यवस्थापनातील 178 कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत वर्ग केले जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 73 कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत वर्ग करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत रूजू करून घेतले असून प्रभाग, क्रीडा विभाग, स्वच्छ सर्वेक्षणचे काम त्यांना देण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीएमपीएमएल व्यवस्थापनातील 178 कर्मचारी महापालिकेच्या विविध संवर्गातील पदांवर सन 2000 पासून कार्यरत होते. मात्र, 2017 मध्ये ‘पीएमपीएमएल’चे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांनी या कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश महापालिकेला दिले. त्यावर महापालिकेतील 178 कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून “पीएमपीएमएल’कडे वर्ग करण्यात आले होते.

दरम्यान, मुंडे यांची बदली झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी पुन्हा महापालिका सेवेत रूजू करून घेण्याची मागणी पदाधिकाऱ्यांकडे केली. याबाबत स्थायी समिती, महासभेत अनेकदा चर्चा झाली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात 1 जानेवारीला पीएमपीएमएलकडे सध्या रुजू असलेल्या 155 कर्मचाऱ्यांपैकी 73 कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. या कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत रुजू करून घेण्यात आले असून प्रत्येक प्रभागात पाच कर्मचारी, क्रीडा विभागात तर काही कर्मचाऱ्यांना स्वच्छ सर्व्हेक्षणचे काम देण्यात आले आहे. उर्वरीत 82 कर्मचाऱ्यांना आवश्‍यकतेनुसार कार्यमुक्त करण्यात येणार असल्याचे पीएमपीएमएल व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)