पीएमपीचे सकाळच्या सत्रात कोटींकडे उड्डाण

84 लाखांचे उत्पन्न

पुणे – रक्षाबंधन हा पीएमपीसाठी सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा दिवस असून शनिवारी सकाळच्या सत्रात पीएमपीला 84 लाख 56 हजार 615 रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामध्ये 81 लाख 63 हजार 975 तिकीट विक्रीतून तर 2 लाख 92 हजार 640 पास विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश आहे. दरम्यान, उत्पन्नाचे प्रमाण कमी असून यावर दिवसभर सुरु असलेला संततधार पावसाचा परिणाम झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रक्षाबंधन हा पीएमपीचा सर्वाधिक उत्पन्नाचा दिवस असतो. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पीएमपी प्रशासनाने जादा गाड्या रस्त्यावर उतरविल्या होत्या. सकाळच्या वेळेत म्हणजेच, पहाटे पाच ते दुपारी एक या वेळेत 1663 बस प्रवाशांच्या सेवेत होत्या. यामध्ये जादा गाड्यांचाही समावेश होता. परिणामी, पीएमपीच्या दैनंदिन सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत उत्पन्न वाढले. मात्र, तरी पीएमपी यावर्षी ठरलेले 2 कोटीचे उद्दीष्ट गाठण्यास जड जाणार असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)