पीएमपीचे “मी कार्ड’ गुंडाळणार?

महामेट्रोचे “कॉमन मोबिलिटी कार्ड’ लवकरच

पुणे – पीएमपीने प्रवाशांच्या सेवेसाठी अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू केलेले “मी कार्ड’ गुंडाळले जाणार आहे. महामेट्रोकडून संपूर्ण शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यावस्था तसेच इतर खासगी प्रवासी सुविधा, पे ऍन्ड पार्किंग तसेच लहान-मोठ्या शॉपिंगसाठी “कॉमन मोबिलिटी कार्ड’ अंमलबजावणीत आणले जाणार आहे. त्यामुळे पीएमपीने लाखो रुपये खर्चून “मी कार्ड’साठी उभारलेल्या यंत्रणेचा खर्च वाया जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महामेट्रोकडून नुकतीच “कॉमन मोबिलिटी कार्ड’ची घोषणा केली आहे. त्यात प्रवाशांना कोणत्याही प्रकारची सुविधा कॅशलेस पद्धतीने उपलब्ध व्हावी, यासाठी हे कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. डेबिट कार्डप्रमाणे हे कार्ड असून ते ऑनलाइन रिचार्जही करता येणार आहे. त्यामुळे या कार्डचा वापर करून प्रवाशांना पुणे मेट्रो, पीएमआरडीए मेट्रो, पीएमपी तसेच पे ऍन्ड पार्किंगच्या सुविधेसह, खासगी ऑनलाइन प्रवासी वाहनांसाठीही वापरता येणार आहे. मात्र, त्यामुळे पीएमपीला “मी कार्ड’ सेवा गुंडाळावी लागणार आहे. पीएमपीने जानेवारी 2017 मधे लॉंच केलेल्या “मी कार्ड’ आतापर्यंत सुमारे 40 हजार प्रवाशांना देण्यात आले असून पालिकेच्या सुमारे 18 हजार कर्मचाऱ्यांना हे कार्ड देण्यात येणार आहे. मात्र, असे असतानाच, पुढील वर्षात मेट्रोचे कार्ड येणार आहे. त्यामुळे पीएमपीचे हे कार्ड बंद होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)