पीएमपीचे डेपो सुरू करण्यासाठी सर्व्हेक्षण

पुणे – ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सेवेसाठी शहराच्या चारही बाजूंना डेपो सुरू करण्याचे पीएमपीएमएल प्रशासनाने निश्‍चित केले आहे. हे डेपो आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत यासाठी प्रशासनाने या भागातील सर्व मार्गांची चाचपणी सुरू केली आहे, त्याशिवाय एसटी महामंडळाची परवानगी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या परवानग्या मिळाल्यानंतर या वर्षामध्येच हे डेपो सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे, त्यामुळे नागरीकरणातही मोठी वाढ झाली आहे. मात्र, प्रवाशांना सेवा देण्यास एसटी महामंडळ आणि पीएमपीएमएल प्रशासनही काहीसे कमी पडले आहे. त्यामुळे नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, त्यातून मार्ग काढण्यासाठी दोनही संस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत प्रयत्न करण्यात आले होते. त्यामध्ये एसटी महामंडळाला काही प्रमाणात अपेक्षित यश आले आहे, तरीही जवळच्या गावांमध्ये ही सुविधा देताना एसटी महामंडळाला काही प्रमाणात मर्यादा येत आहेत. त्यामुळेच स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी अन्य पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे, त्याचाच एक भाग म्हणून स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायत प्रशासनांनी त्यांच्या गावांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गावकऱ्यांच्या या मागण्या लक्षात घेऊन या गावांमध्ये बसेस सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, तरीही पुणे शहरातील डेपोंमधून या बसेस सोडणे प्रशासनाला शक्‍य होणार नाही. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाने आता नवा पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिंदेवाडी, वाघोली यासह शहराच्या अन्य चार बाजूंना नव्याने डेपो सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता, विशेष म्हणजे या नव्या डेपोंसाठी प्रशासनाच्या काही जागा ताब्यातही आल्या आहेत. त्यानंतरचा टप्पा म्हणून या नव्या डेपोंमधून नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या मार्गांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे, त्यानंतर हे मार्ग निश्‍चित करण्यात येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)