पीएमपीचे जळीतसत्र थांबणार तरी कधी?

असुरक्षित प्रवासामुळे भीतीचे वातावरण


दररोज 10 लाख प्रवाशांच्या जीवाला धोका


ठेकेदारांच्या बसेससाठी ठोस धोरण का नाही?

पुणे – शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा असलेल्या पीएमपीला आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. सरासरी प्रत्येक दीड महिन्याला एक बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचे पीएमपीच्या अधिकृत आकडेवारीवरुन समोर आले आहे. परिणामी, सर्वसामान्यांना रास्त आणि सुरक्षित सेवा देण्यास पीएमपी असक्षम ठरत असून पीएमपीचे हे जळीतसत्र थांबणार तरी कधी?, असा सवाल पुणेकर करत आहेत.

पीएमपी बसेसमधून प्रवास करणाऱ्यांची दैनंदिन संख्या 10 लाखांच्या घरात आहे. शहरातंर्गत प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक पीएमपीचा वापर करतात. पीएमपीदेखील त्यांना सवलतीच्या दरात सेवा पुरवते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पीएमपीला मार्गावर आग लागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. तर, काही बसेसना डेपोंमध्येच आग लागल्याचे दिसून आले. यामुळे सर्वसामान्यांसाठी पीएमपीचा प्रवास असुरक्षित ठरत आहे. अशा प्रकारे सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे पीएमपीबद्दल मनात चुकीचा संदेश जात असून परिणामी, प्रवासी संख्या घटत चालली आहे. आग लागण्यासारखे प्रकार सातत्याने होत राहिल्यास भीतीपोटी लोक प्रवास करणेही टाळू लागतील. परिणामी, दैनंदिन उत्पन्न कमी होऊन अगोदरच अर्थिक कोंडीत सापडलेल्या पीएमपीला जमा-खर्चाचे गणित जुळवणे कठीण होणार आहे. या घटना कशा टाळता येतील, हे प्रशासनाने पाहणे गरजेचे आहे. मात्र, पीएमपीकडून ही बाब गंभीरतेने घेण्यात येत नसल्याचे दिसून येते. याचे उदाहरण म्हणजे आग लागणाऱ्या बसेसमध्ये सर्वाधिक बसेस कंत्राटी असून ठेकेदारांकडून चालवल्या जातात. ठेकेदारांसाठी पीएमपीचे ठोस धोरणे नसल्याचे दिसून येते. यामुळे ब्रेकडाऊन, आग लागणे, कामचुकार ड्रायव्हर यांच्याकडून कामचुकारपणा होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, प्रवाशांना चांगली सेवा मिळत नसल्याने पीएमपीचे नाव खराब होत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आग लागलेल्या बसेसची संख्या


एप्रिल 2016 ते डिसेंबर 2017 – 13 बसेस
जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 – 8 बसेस


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)