पीएमपीचे चिल्लर घेण्यास बॅंकेचा नकार!

15 लाखांच्या ढीग : मर्यादा नियमांचा बॅंकेकडून दाखला

पुणे – पीएमपीच्या तिकीट विक्रीतून जमा होणारी चिल्लर रक्कम स्वीकारण्यास सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने नकार दिला आहे. दि.4 पासून त्यांच्याकडून ही रक्‍कम स्वीकारली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पीएमपीकडे जवळपास 13 ते 15 लाख रुपये चिल्लर जमा झाली आहे. या पैशांचे करायचे काय? असा पेच प्रशासनाला पडला आहे.

पीएमपीच्या तिजोरीत दररोज जवळपास दीड ते दोन लाख रुपये चिल्लर जमा होते. ही रक्कम पुणे कॅम्प येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखेत जमा केली जाते. मात्र, बॅंकेने दि.4 ऑक्‍टोबरपासून ही चिल्लर स्वीकारण्यास नकार दिला आहे. विशिष्ट मर्यादेपर्यंत रक्कम स्वीकारली जाणार असल्याचे बॅंकडेकडून सांगितले जात आहे. यामुळे पीएमपीने गेल्या सहा ते सात दिवसांपासूनही रक्‍कम साठवून ठेवली आहे. यासंदर्भात प्रशासनाने बॅंकेशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, यानंतरही बॅंकेने रिझर्व्ह बॅंकेचा हवाला देत ही रक्कम घेणार नसल्याचे सांगितले आहे.

येत्या काळात अडचण होणार
चिल्लर रकमेसंदर्भात बॅंकेने घेतलेल्या भूमिकेमुळे प्रशासनासमोर संकट उभे राहिले आहे. यावर तोडगा न निघाल्यास परिस्थिती गंभीर होणार असून कामकाजात सुसूत्रता राखणे अडचणीचे होणार आहे. दैनंदिन खर्चासाठी पैशांची टंचाई भासण्याबरोबरच इतर प्रश्‍नही उभे राहणार आहेत. यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पीएमपी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असून प्रवाशांकडून सुट्टे पैसे स्वीकारले जातात. यातून दररोज मोठ्या प्रमाणात रक्‍कम जमा होते. नियमानुसार “करन्सी’ नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून सेंट्रल बॅंकेकडून सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे.
– अजय चारठणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. कंडक्टर ला तर नोट दिल्यावर नेहमीच सुटटे नाहीयेत अस सांगीतल जात.
    मग चिल्लर तर जमा होणारच PMP कडे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)