पीएमपीची सीएनजी बस पूर्णपणे जळून खाक ; वाहतूक पोलिसांची तत्परता

पुणे: विश्रांतवाडीवरुन शहराच्या दिशेने येणाऱ्या पीएमपीच्या सीएनजी बसने अचानक पेट घेतला. यात बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. दरम्यान, गाडीतून धुर येऊ लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने तातडीने प्रवाशांना उतरवून दिल्याने मोठी दुर्घटना टळली.

मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास संचेती हाँस्पिटलसमोरील पुलावर ही घटना घडली. विश्रांतवाडीवरुन अडीच वाजता कोथरुडसाठी (mh 12 hb 1614)  बस मार्गक्रमण करत होती. संचेती पुलावर बस आल्यावर बसच्या इंजिनमधून धूर बाहेर येऊ लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. यानंतर चालकाने गाडी बंद करुन खाली उतरुन पाहीले असता धुराचे प्रमाण जास्त असल्याने चालकाने तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवून दिले. आणि चालकानेच अग्निशमन दल, पोलीसांना फोन करुन घटनेची माहीती दिली. मात्र, तोपर्यंत बस पुर्णत: आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यानंतर अग्निशामन यंत्राच्या सहाय्याने आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र मात्र आगीचे प्रमाण एवढे मोठे होते की, पूर्ण बस जळून खाक झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाहतूक पोलिसांची तत्परता

बसला पुलावरच आग लागल्याने पाठीमागे वाहनांची मोठी रांग लागली होती. मात्र, घटनेची माहीती मिळताच खडकी वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक सुनिल भोसले, काँन्स्टेबल नाजीम शेख, महादेव कोठावळे, रामहरी मोरे, ए.बी. केदारी, व्ही.एन. गिरासे यांनी वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. वैहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे काही वेळातच वाहतूक सुरळीत झाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)