“पीएमपी’ची प्रत्येक बस राहणार स्वच्छ

स्वयंचलित यंत्रणा : 10 मिनिटांत बस स्वच्छ होणार

पुणे – पीएमपीची प्रत्येक बस स्वच्छ असावी यासाठी प्रशासनाने स्वयंचलित स्वच्छता यंत्र खरेदी केले असून काही डेपोंमध्ये ते कार्यान्वित केले आहे. या यंत्रणेच्या सहाय्याने फक्‍त 5 ते 10 मिनिटांत संपूर्ण बस स्वच्छ करता येणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाने शहरासह उपनगरांत सेवा पुरवली जाते. अनेकदा पीएमपीच्या ताफ्यातील बसेस अस्वच्छ असल्याच्या तक्रारी येत होत्या. तसेच, कर्मचाऱ्यांच्या हातून वेळोवेळी बसेस स्वच्छ करण्यासाठी मर्यादा येत असल्याने अनेकदा अस्वच्छ बस मार्गावर येत असत. या पार्श्‍वभूमीवर बसेस स्वच्छतेसाठी स्वयंचलित यंत्र खरेदी करण्यात आले आहे. सध्या सहा डेपोंमध्ये ते कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित डेपोमध्ये ते बसवण्याचे काम सुरू आहे. इन्वेन्टा क्‍लिंटेक प्रा. लि. या कंपनीकडून ही यंत्रखरेदी करण्यात आली असून एका यंत्राची किंमत 6 लाख 19 हजार 500 रुपये आहे. कमानीच्या आकाराचे यंत्र असुुन या यंत्रात बस उभी केल्यास ती धुतली जाते. यंत्राच्या दोन्ही बाजूस ब्रश असल्याने बस स्वच्छ धुतली जात असून कर्मचाऱ्यांना काम करावे लागत नाही.

येथे कार्यान्वित असेल यंत्रणा
स्वारगेट, पिंपरी-चिंचवड, कोथरुड, शेवाळवाडी, मार्केटयार्ड, पुणे स्टेशन डेपोंमध्ये ही स्वच्छता यंत्र बसविण्यात आले आहे.

सहा डेपोंमध्ये स्वयंचलित स्वच्छता यंत्रणा यंत्रणा सुरू करण्यात आली असून इतर ठिकाणी केले जाणार आहे. यापूर्वीही वेळोवेळी बसेस स्वच्छ करण्यात येत असून यंत्रणेमुळे अगदी कमी वेळेत हे काम होणार आहे.
– नयना गुंडे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालका, पीएमपी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)