पीएमपीकडे बसेस आहेत, चालकच नाहीत!

चालकाअभावी बसेस होतायेत रद्द


कामचुकार कर्मचाऱ्यांचा फटका

पुणे – लोकसंख्येच्या तुलनेत पीएमपी बसेसची संख्या कमी असल्याने नव्या बसेसची खरेदीप्रक्रिया सुुरू आहे. पण, सध्या उपलब्ध बसेसलाच चालक मिळत नसल्याचे दिसून येत आहे. चालकाअभावी रोज अनेक फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर येत असून सोमवारी तब्बल 56 बसेस रद्द कराव्या लागल्या आहेत.

मागील काही महिन्यांपासून पीएमपीच्या अर्थिक तोट्यात वाढ होत असून याचे खापर अपुऱ्या बससंख्येवर फोडण्यात येते. मात्र, दुसरीकडे कामचुकार कर्मचारी, सतत गैरहजर चालक यांच्यामुळेही परिस्थिती बिघडत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. सोमवारी चालक नसल्याने हडपसर-12 आणि पुणे स्टेशन-11 बसेस रद्द करण्यात आल्या. तर अन्य डेपोंतून 23 बसेस रद्द कराव्या लागल्या. यामुळे अगोदरच अपुरी संख्या आणि यातही कामचुकार कर्मचारी यामुळे पीएमपीचा पाय खोलात जात आहे. काही ठराविक डेपोंमध्ये कामचुकारांची संख्या जास्त असून वारंवार गैरहजर राहण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे पीएमपीला तोटा सहन करावा लागत असून यावर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे.

पीएमपीच्या सर्व डेपो मॅनेजरांसोबत बैठक घेण्यात आली आहे. यात त्यांना सूचना करण्यात आल्या असून सातत्याने गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. गैरहजर राहणाऱ्यांची माहिती घेऊन कडक कारवाई केली जाईल.
– अजय चारठाणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी.

नव्या मिडी बसेसलाही ग्रहण
पीएमपी ताफ्यात आयुर्मान संपलेल्या बसेसची संख्या लक्षणीय आहे. यामुळे “ब्रेकडाऊन’ होण्यामध्ये या बसेसचे प्रमाण जास्त असून देखभाल दुरुस्तीचा खर्चही मोठा आहे. मात्र, नव्याने दाखल झालेल्या मिडीबसेसलाही बिघाडाचे ग्रहण लागल्याचे दिसून येते. दरवाजे उघडे राहणे, डिजिटल बोर्ड बंद अशा समस्या असून याच्या देखभाल दुरुस्तीकडेही देखभाल दुरुस्ती विभागाच्या प्रमुख्यांचे दुर्लक्ष होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)