पीएमपी’कडून 407 कोटींची मागणी

PMPML, Pune

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता अंदाजपत्रकात एकूण 407 कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी पीएमपीएमएल प्रशासनाने केली आहे. महापालिका आयुक्त तथा पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना या मागणीचे लेखी पत्र दिले आहे. विद्यार्थ्यांना मोफत बसपास, विविध घटकांना दिले जाणारे सवलतीचे बसपास, बस खरेदी आणि संचलन तुटीचा खर्च या पत्रात नमूद केला आहे. संचलन सुरळीत सुरू राहण्यासाठी दरमहा 4 कोटी 18 लाख रुपये निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी या पत्रात केली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अखत्यारितील अनुक्रमे पीएमटी आणि पीसीएमटी या दोन्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे 2007 साली एकत्रीकरण करून, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीमध्ये पुणे महापालिकेचा 60 टक्के तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा 40 टक्के स्वामित्व हक्क आहेत. ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फायद्यात आणण्यासाठी केलेले आतापर्यंतचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. त्यानुसार ही वाहतूक कंपनी सुरू ठेवण्यासाठी या कंपनीला दोन्ही महानगरपालिकांच्या आर्थिक मदतीवरच आजपर्यंत अवलंबून रहावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. नवीन बस खरेदी, कर्मचाऱ्यांचा बोनस, सुटे भाग खरेदी, संचन तुट याकरिता लागणाऱ्या खर्चाकरिता पीएमपीएमएल प्रशासनाकडून कायम निधीची मागणी होत आहे.
पूर्वाश्रमीच्या पीसीएमटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सापत्नभावाच्या वागणुकीची लोकप्रतिनिधींकडून कायम तक्रार केली जात आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड शहरातील विविध मार्गांवर सोडल्या जाणाऱ्या जुन्या बस व अपुरी बससेवा, लोकप्रतिनिधींकडून वारंवार मागणी होऊनही नवे बसमार्ग करण्याकडे होणारे पीएमपीएमएल प्रशासनाचे दूर्लक्ष याशिवाय पिंपरीत पीएमपीएमएलचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात होत असलेल्या वेळकाढूपणामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे लोकप्रतिनिधींकडून कायम पीएमपीएमएलची आर्थिक कोंडी करण्याची महासभेत मागणी केली जाते. त्यामुळे यंदा कोणत्याही प्रकारची आर्थिक कोंडी होऊ नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून ही तरतूद करण्याविषयीचे लेखी पत्र दिले आहे. या पत्रामध्ये गतवर्षीच्या आर्थिक तरतुदींचा देखील संदर्भ देण्यात आला आहे.

हा खर्च सादर करताना पीएमपीएमएल प्रशासनाने सद्यस्थिती मांडली आहे. त्यामध्ये एमएनजीलला सीएनजी गॅस पुरवठ्यासाठी 26 कोटी रुपये, सेवानिवृत्त सेवकांची तोषदान 20 कोटी रुपये व तोषदान फरक 21 कोटी अशी एकूण 67 कोटींची देणी प्रलंबित आहेत. सेवकांचे पगार, इंधन व देखभाल दुरुस्तीवरळ खर्चात सात्त्याने वाढ होत असल्याने, दैनंदिन खर्च भागविणे अडचणीचे झाले आहे. सन 2019-20 मध्ये सन-2018-19 मधील एकूण 244.55 कोटी संचलन तुटीपोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेने 97 कोटी 82 लाख निधी उपलब्ध करुन दिला, तरी देखील दैनंदिन खर्चास निधी कमी पडणार असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन वार्षिक (रक्‍कम कोटीत) प्रति महा (कोटीत)
2019-20 अपेक्षित उत्पन्न 1118.90 93.24
सन 2019-20 अपेक्षित खर्च 1188.69 124.06
सन 2019-20 येणारी तूट 369.79 30.82
तुटीपोटी दोन्ही महापालिकांकडून येणारा निधी 244.55 20.38
दैनंदिन खर्चाकरिता कमी पडणारी रक्कम 125.24 10.44
पुणे महापालिका 60 टक्के स्वामित्व हक्कानुसार 75.14 6.26
पिंपरी-चिंचवड महापालिका 50.10 4.18

अंदाजपत्रकातील रकमेची केलेली मागणी पुढील प्रमाणे –
तपशील तरतूद
पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पास 3 कोटी 37 लाख
नागरवस्ती विकास योजना- अंध/अपंग पासेस 4 कोटी 77 लाख
विविध सवलतीचे पास 18 कोटी
संचलन तूट (शासन निर्णयानुसार) 97 कोटी 82 लाख
नवीन 400 बस खरेदी (40 टक्के स्वामित्व हक्कानुसार) 17 कोटी 60 लाख
ई- बस सबसिडी 150 बस ( 40 टक्के स्वामित्व हक्कानुसार) 30 कोटी
ई- बस सबसिडी 350 बस ( 40 टक्के स्वामित्व हक्कानुसार) 70 कोटी
ई- बस सबसिडी 300 बस ( 40 टक्के स्वामित्व हक्कानुसार) 60 कोटी
बीआरटीअंतर्गत आयटीएमएस सॉफ्टवेअर, हॉर्डवेअर 4 कोटी 70
डेपो विकसन 42 कोटी
वाढीव उत्पादनांवरील खर्च 8 कोटी 69 लाख
संचलन सुरळीत राहण्यासाठी ( 40 टक्के स्वामित्व हक्क ) 50 कोटी 10 लाख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)