पीएमपीएल चालक, वाहकाला मारहाण करणाऱ्या तिघांना अटक

पुणे-रस्त्यावर दुचाकीवर थांबलेल्या मुलांकडे साईड आरशातून पाहिल्याने पीएमपीएल चालक आणि वाहकाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा प्रकार कोंढवा येथील समतानगर वसाहतीसमोर घडला. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. बुधवारी (दि. 5) रात्री 8.45 सुमारास ही घटना घडली. आकाश ज्ञानेश्‍वर सोनवणे (रा. वानवडी), पंकज बाबुराव भालेराव (वय 20, रा. महंमदवाडी) आणि शेखर हनुमंत राठोड (वय 19, रा. कोंढवा), अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत सचिन रायकर (वय 28, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी पीएमपीएलमध्ये चालक आहेत. घटनेच्या वेळी ते पीएमपीएल कोथरूड डेपो ते कोंढवा घेऊन जात होते. त्यावेळी त्यांचे समोर दुचाकीवर ही मुले थांबली होती. गाडी पुढे घेऊन जात असताना फिर्यादींनी साईड आरशातून त्यांच्याकडे पाहिले. त्यावेळी त्यांनी चिडून फिर्यादींना गाडी थांबवायला लावली. फिर्यादी आणि वाहक यांना पट्ट्याने आणि हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. कोढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. वाडकर अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)