पीएमपीएल चालकाला सक्तमजुरी

पुणे- पीएमपीएलने धडक देऊन अडीच वर्षाच्या मुलीच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी चालकाला 1 वर्षे सक्तमजुरी आणि 4 हजार 100 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.डी.मेश्राम यांनी हा आदेश दिला आहे.
अशोक हरी वाघमारे ( रा. फुरसंगी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ऋतुजा निशांत लोंढे (रा. कसबा पेठ) असे अपघातात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत हरीप्रिया शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 25 जुलै 2007 रोजी दुपारी 12.20 च्या सुमारास कसबा पेठेत सार्वजनिक रस्त्यावर घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी काम पाहिले. त्यांनी तीन साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी आणि तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. फरासखाना पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल नागेश राख यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. वाघमारे नरवीर तानाजी वाडी येथून फडके हौद चौक मार्गे हडपसर येथे पीएमपीएमएल बस घेऊन चालला होता. त्यावेळी शाळा सुटल्याने ऋतुजा घराकडे चालली होती. पीएमपीएमएलने धडक दिल्यामुळे झालेल्या अघपातात ऋतुजा हिचा मृत्यू झाला. या प्रकरणात फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. बेदरकारपणे गाडी चालवल्यास अपघात होण्याची शक्‍यता असते. त्यामध्ये कोणाचा तरी जीव जाण्याची शक्‍यता असते. या अपघातात चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. अन्यथा समाजात चुकीचा संदेश जाईल, असा युक्तीवाद ऍड. क्षीरसागर यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने वाघमारे याला शिक्षा सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)