पीएमपीएलच्या चालक-वाहकास मारहाण

पुणे – उलटया दिशेने का आला आणि शिवीगाळ का केली याचा जाब विचारल्याने पॅगो रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी ” पीएमपीएमएल’ चे चालक आणि वाहकांना बेदम मारहाण केली. कात्रज येथील बीआरटी बसथांब्याजवळ 29 ऑगस्ट रोजी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, भारती विद्यापीठ पोलीसांनी याप्रकरणी पॅगो रिक्षाचालकासह तिघांना अटक केली आहे.

राहूल हरिश्‍चंद्र मिसाळ (वय 30, रा. साईनगर, कात्रज), शंकर शहाजी ढेकणे (वय 26) आणि कपिल राजेंद्र परदेशी (वय 27, दोघेही रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात दयानंद महाडिक (वय 47, रा. दत्तनगर, आंबेगांव बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महाडिक हे ” पीएमपीएमएल’ च्या बसवर वाहक म्हणून काम करतात. ते आणि त्यांचे चालक सहकारी रविंद्र जगताप हे कात्रज ते भोसरी अशी बस घेऊन निघाले होते. जगताप यांनी त्यांची बस कात्रज येथील बीआरटी थांब्याच्या जवळ थांबविली होती, त्यावेळी राहूल मिसाळ हा त्याची पॅगो रिक्षा घेऊन उलटया दिशेने आला असता जगताप आणि मिसाळ यांची बाचाबाची झाली. मिसाळ याने जगताप यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याचा जाब विचारण्यासाठी महाडिक आणि जगताप हे बसच्या खाली उतरले. हे दोघे मिसाळ याला जाब विचारत असतानाच मिसाळ, ढेकणे आणि परदेशी यांनी महाडिक आणि जगताप यांना लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. फिर्याद दिल्यानंतर मिसाळ आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)