‘पीएमपीएमएल’चा तोटा येणार प्रवाशांच्या मुळावर…!

पुणे : शहरासाठी पीएमटी ही स्वतंत्र वाहतूक संस्था असताना या वाहतूक व्यवस्थेवर राजकीय वचक होता. त्याशिवाय महापालिका प्रशासनाचेही या कारभारावर नियत्रंण होते. त्यामुळे या तोट्यावर आणि कारभारावर महापालिका प्रशासन आणि पीएमटीच्या संचालक मंडळाची करडी नजर होती. त्यामुळे या संस्थेचा तोटा कधीही पन्नास ते साठ कोटी रुपयांच्या पुढे गेला नाही. मात्र, पीएमटी आणि पीसीएमटीचे विलीनीकरण करुन पीएमपीएमएल ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अस्तित्वात आल्यानंतर या वाहतूक संस्थेवर अध्यक्षांशिवाय कोणाचेही फारसे नियंत्रण राहिलेले नाही.

त्यामुळेच हा तोटा कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे, असे जाणकारांचे मत आहे. त्याशिवाय प्रशासनाला होणारा तोटा हा प्रवाशांच्याच मुळावर येण्याची शक्‍यताही या जाणकारांनी व्यक्त केली आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)