पीएमटीच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

आळंदी- पुण्याकडे जाणाऱ्या पीएमटीने दुचाकीस्वारास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पुणे-आळंदी मार्गावर वाय जंक्‍शन (एस. टी. बसस्थानकासमोर शुक्रवार (दि. 11) दुपारी पावणेतीनच्यादरम्यान घडली. कैलास काशिनाथ नाईक (वय 23, रा. केळगांव रोड, आळंदी देवाची) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी स्वाराचे नांव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आळंदीहून मनपा भवनकडे जाणारी पीएमटी (एम. एच. 12 एफ झेड 8348) जात होती. यावेळी त्याचदिशेने पुण्याकडे जाणारा दुचाकीस्वार चालला होता. त्यावेळी दुचाकीस्वारास पीएमपीएल बसची जोरदार ठोकर बसली. यात दुचाकीस्वार हा मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी वाढल्याने मारहाणीच्या भीतीने पीएमपी चालक बस सोडून पळून गेला. यावेळी प्रवाशी देखील धावत सुटले. स्थानिक नगरसेवक सचिन गिलबिले, सामाजिक कार्यकर्ते संदेश ऊर्फ पप्पू तापकीर, सेनेचे सुरेश झोंबाडे आदींनी अपघातस्थळी धाव मदत कार्य केले. ठोकर देणाऱ्या पीएमटी चालकाचे नाव समजले नाही. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)