पीएमएस – अतिश्रीमंत होण्यासाठीचा श्रीमंतांचा गुंतवणूक फंडा (भाग-१)

गुंतवणुकीच्या दृष्टीनं बराच बोलबाला असलेल्या परंतु सर्वसामान्यांना फारसे परिचित नसलेल्या अजून एका प्रॉडक्टविषयी आज आपण जाणून घेऊयात. आजवर आपण गुंतवणुकीच्या दृष्टीनं अगदी डे-ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग, दीर्घ मुदतीसाठीची गुंतवणूक, म्युच्युअल फंड, वेल्थ क्रिएशनसाठीची गुंतवणूक अशा विविध पर्यायास सामोरे गेलो, परंतु या पर्यायाव्यतिरिक्त मोठ्या गुंतवणुकीसाठी अजून एक चांगला पर्याय ठरू शकतो तो म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस (PMS). यामध्ये कमीत कमी गुंतवणूक ही साधारणपणे २५ लाखांच्या पुढं असावी लागते. त्यामुळं सर्वसामान्य किरकोळ गुंतवणूकदार अशा गोष्टीपासून दूर असतात. त्यामुळं सर्वसामान्यांना अशा गोष्टीची माहिती मिळत नाही. परंतु त्याबद्दल कुतूहल मात्र असतंच आणि गुंतवणुकीच्या प्रत्येक प्रकारची आपण माहिती करून घेणं हे प्रत्येक गुंतवणूकदाराची आज गरज ठरत आहे.

इ.स. २००० चा  काळ होता जेव्हा लोकांना मुदत ठेव व रिकरिंग याव्यतिरिक्त गुंतवणूक म्हणजे एलआयसी व फारतर यूलिप इतक्याच गोष्टी ठाऊक होत्या परंतु त्याबद्दल फारसं ज्ञान नसल्यानं वमिससेलिंगमुळं अनेकांची फसगत झाली. त्यामुळं एकतर सर्वसामान्य चाकरमानी जनता शेअर बाजारापासून चार हात दूर रहात होती आणि त्यातच जानेवारी २००८ नंतरच्या अमेरिकेतील मंदीनं अजूनच भर घातली. परंतु, त्याउलट नंतरच्या दिवसात सरकारनी व कांही बँकांनी केलेल्या जाहिरातीत ‘म्युच्युअल फंड’ बद्दल बरीच जनजागृती झाली व गेल्या ३-४ वर्षांत “म्युच्युअल फंड सहीं हैं।” म्हणत अगदी कामगारवर्ग देखील या पर्यायात सहभागी झालाय असो.

आज आपण वर उल्लेखल्याप्रमाणं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस बद्दल जाणून घेऊयात. तशी ही सेवा ही खूप जुनी आहे परंतु काही ठराविकच गुंतवणूकदार ही सेवा घेत असल्यानं हा प्रकार लोकांच्या फारसा परिचयाचा नाही.

पीएमएस – अतिश्रीमंत होण्यासाठीचा श्रीमंतांचा गुंतवणूक फंडा (भाग-२)

या सेवेदरम्यान गुंतवणूकदार व सेवा देणाऱ्या कंपनीदरम्यान एक करार केला जातो, ज्यामध्ये गुंतवणूक योजना, उद्दिष्ट, जोखीम व अन्य काही गोष्टी नमूद असतात. यामध्ये गुंतवणूकदार एकूण २५ लाख रु.रक्कम तरी देऊ शकतो किंवा तितक्या किमतीचे शेअर्स. PMS सेवा दोन प्रकारची असू शकते, स्वेच्छाधीन (discretionary) अथवा अस्वेच्छाधीन (non-discretionary). पहिल्या प्रकारात गुंतवणूक व्यवस्थापक (किंवा कंपनी) आपल्याकडं गुंतवणूकदाराकडून त्याच्या वतीने शेअर्स निवडून ते खरेदी करण्याची व विकण्याची पॉवर ऑफ ॲटर्नी (मुखत्यार अधिकार) घेऊन ठेवतो तर दुसऱ्या प्रकारात कंपनी फक्त कोणते शेअर्स घ्यायचे व विकायचे याचा सल्ला देते व प्रत्यक्ष शेअर्सची खरेदी-विक्री ही गुंतवणूकदारावर सोपवली जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)