पीएमएस – अतिश्रीमंत होण्यासाठीचा श्रीमंतांचा गुंतवणूक फंडा (भाग-२)

पीएमएस – अतिश्रीमंत होण्यासाठीचा श्रीमंतांचा गुंतवणूक फंडा (भाग-१)

म्युच्युअल फंड – पीएमएस यातील फरक :

गुंतवणूक : यातील कमीत कमी गुंतवणूक मोठी असल्यामागचं कारण म्हणजे ही गुंतवणूक वैयक्तिकरित्या केली जाते अगदी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीच्या धोरणाच्या उलट, त्यामुळं जर गुंतवणूक व्यवस्थापकास उदा. एमआरएफच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी वाटली व त्याचा अगदी १ शेअर्स खरेदी करायचा झाल्यास ती ६५००० रुपयांची गुंतवणूक ठरेल त्यामुळं गुंतवणूकदारांचं हित लक्षात घेऊन सेबीच्या मार्गदर्शन तत्वानुसार या पर्यायात कमीत कमी गुंतवणूक रक्कम ही २५ लाखांच्या पुढं असते.

यातील गुंतवणूक ही गुंतवणूकदाराच्या उदद्दीष्टानुसार, जोखमीनुसार केली जाते त्यामुळं सर्व गुंतवणूकदारांसाठी कदाचित वेगवेगळा पोर्टफोलिओ असू शकतो. तर म्युच्युअल फंडचा सर्वांसाठीएक ठराविक पोर्टफोलिओ असतो मग गुंतवणूक रु.५०० असो वा रु. ५० लाख.

नफेखोरी : सेबीच्या नियमानुसार गुंतवणूकदारांचं हित लक्षात ठेवून म्युच्युअल फंड स्कीममधील कोणत्याही एका कंपनीच्या शेअर्समधील गुंतवणूक ही एकूण पोर्टफोलिओच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. पीएमएस मध्ये असा कोणताही नियम नसल्यानं याचा फायदा दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना होऊ शकतो. उदा. जर एका म्युच्युअल फंड स्कीम मध्ये बजाज फायनान्सचे १ लाख किमतीचे शेअर्स असतील (एकूण गुंतवणूक १० लाख रु. गृहीत धरून) तर त्यांचं मूल्य १ लाख १५ हजार रुपयांवर गेल्यास (१५% वाढ), नियमानुसार ते १.१५ लाख रुपयांच्या आत राहावं यासाठी त्या कंपनीचे थोडे थोडे शेअर्स हे विकले जातील. म्हणजेच जर २०१३ साली १०५ रुपयाच्या भावानं ९५२ शेअर्स खरेदी केले गेले असतील, तर २०१८ मधील अत्युच्च भावानुसार (२९८५) त्या स्कीममध्ये केवळ ३३ शेअर्सच शिल्लक असतील. याउलट पीएमएसमध्ये त्याच ९५२ शेअर्सद्वारे केलेल्या १ लाख रुपये गुंतवणुकीचे २९८५ रु. भावानुसार २८,४१,७२० रुपये झालेले असतील. हा मोठा फायदा पीएमएसमध्ये आहे.

फी : म्युच्युअल फंडची फी ही आधी ठरवलेली असते तर पीएमएसच्या बाबतीत वाटाघाटी करता येऊ शकतात. तसेच पीएमएसमध्ये ठराविक अवधीत झालेल्या ठरावीक परताव्याच्या पलीकडं २०% किंवा तत्सम भागावर कंपनीचा हक्क असतो व तसा करारात उल्लेख देखील केलेला असतो. उदा. १२% प्रतिवर्ष नफ्याचा उल्लेख असेल तर त्या एका वर्षात २०% परतावा मिळाल्यास केवळ ८% (२०-१२) नफ्यातील रकमेच्या २०% प्रॉफिट शेअरिंग असते. याउलट म्युच्युअल फंड मध्ये अशी प्रॉफिट शेअरिंगची पद्धत नाहीय. पीएमएसची वार्षिक फी ही साधारणपणे २% असते तर म्युच्युअल फंडमध्ये एक्स्पेंस रेशो हा साधारणपणे ०.७५ % ते १.५% असतो.

जोखीम :  म्युच्यअल फंडमधील शेअर्सच्या संख्येपेक्षा पीएमएसमधील शेअर्सची संख्या ही मोजकीच असते त्यामुळं जोखीम थोडी जास्त असते.

कोणासाठी ? : पीएमएस ही सेवा शक्यतो मोठे गुंतवणूकदार (HNI), मोठ्या कंपन्या, HUF, पार्टनरशिप फर्म व प्रोप्रायटरी फर्म इ. स्वीकारताना दिसतात.

कर प्रणाली : इक्विटीमधील थेट गुंतवणुकीवरील नफ्याचा व पीएमएसमधील गुंतवणुकीवरील नफ्याचा दर एकच आहे.

कार्यप्रणाली : गुंतवणूक करण्यापासून ते संपूर्ण गुंतवणूक काढून घेईपर्यंत कोणताच आटापिटा नाही, सर्व सेवा घरपोच असते.

पारदर्शकता : म्युच्युअल फंड पेक्षा यामध्ये पारदर्शकता अधिक असते कारण पीएमएसद्वारे घेतलेल्या व विकलेल्या सर्व शेअर्सचे व्यवहार हे गुंतवणूकदाराच्याच डी-मॅट खात्यावरून होत असतात, त्यामुळं संपूर्ण पारदर्शकता असते की कोणता शेअर काय भावात व किती संख्येत खरेदी अथवा विक्री केला गेलाय.

नियंत्रण : पीएमएसच्या तुलनेत सेबी या सरकारी संस्थेद्वारे म्युच्युअल फंड हे जास्त बारकाईनं लक्ष ठेवले जातात.

कमीत कमी गुंतवणूकदार निकष : म्युच्युअल फंड च्या कोणत्याही एका स्कीम मध्ये कमीत कमी २० गुंतवणूकदार असल्याशिवाय त्या स्कीमला परवानगी मिळत नाही तर असा कोणताही निकष पीएमएसच्या बाबतीत लागू होत नाही. मात्र पीएमएस सेवा देणाऱ्या संस्थेस सेबीची मान्यता असावी लागते.

रेकॉर्ड : पीएमएसची कामगिरी ही प्रत्येक पोर्टफोलिओनुसार वेगवेगळी असू शकते त्यामुळं एक ठराविक अशी कामगिरीची आकडेवारी जाहीर करता येत नाही तर म्युच्युअल फंडाची कामगिरी जाहीर असते.

लाभांश : म्युच्युअल फंडच्या बाबतीत कंपन्यांनी जाहीर केलेला लाभांश थेट प्रकारे मिळत नाही परंतु पीएमएसच्या बाबतीत असे जाहीर झालेले लाभांश गुंतवणूकदाराच्या थेट बँक खात्यात जमा होतात.

पीएमएसचे फायदे : व्यावसायिक व्यवस्थापन, निष्णात व्यवस्थापकाद्वारे अथवा अग्रगण्य व्यवस्थापन कंपनीमार्फत तुमची गुंतवणूक केली जाते व त्याचा मागोवा घेतला जातो व त्यानुसार गुंतवणुकीच्या व्यूहरचनेत योग्य ते बदल केले जातात.

पीएमएस सेवा देणाऱ्या बाजारातील अग्रगण्य कंपन्यांची नावं : मोतीलाल ओसवाल, इन्व्हेस्को, एएसके.

मोठ्या गुंतवणूकदारांसाठी हा वेगळा पर्याय नक्कीच पडताळता येऊ शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)