…आता मध्यप्रदेशातील घरं होणार ‘मोदीमय’

भोपाळ – पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या प्रतिमा लावण्यात येणार असून, मध्य प्रदेश सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या नागरी प्रशासन विभागाने सर्व पालिकांना याबाबत आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, पीएमएवाय योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या घरात मोदी आणि चौहान यांच्या ४५० बाय ६०० एमएमच्या दोन टाईल्स लावण्यात येणार आहेत. यांपैकी एक टाईल स्वयंपाक घरातील किचन ओट्याच्यावर लावायची आहे तर दुसरी टाइल घराच्या मुख्य दरवाजाच्यावर लावायची आहे.

-Ads-

या टाईल्सच्या वर सबका सपना-घर हो अपना अशी वाक्येही लिहीण्यात येणार आहेत. तसेच दुसऱ्या प्रकारे डाव्या बाजूला मोदींची तर उजव्या बाजूला चौहान यांची प्रतिमा लावण्यात येणार आहे. या दोन्ही प्रतिमांच्या मध्ये घोषवाक्य तसेच त्याच्यावर दीन दयाल उपाध्याय यांची प्रतिमा लावाव्यात असे आदेशही  देण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)