पीएमआरडीए हद्दीत विविध धरणांतून पाणी देणार

संग्रहित छायाचित्र

उपलब्ध पाण्याची करणार बचत 


3 टीएमसी पाणी देणार

पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) पिण्याचे पाणी कमी करून नाही तर त्यात बचत करून पाणी पुरवठा केला जाणार आहे. फक्त खडकवासला प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येणार नसून त्या-त्या भागातील धरणांमधून पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

जलसंपदा विभागाने नुकतीच पीएमआरडीएला 3 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी बापट म्हणाले, महापालिका हद्दीच्या बाहेर 5 किलो मीटरपर्यंत पाणी देण्याची जबाबदारी सरकारनेच महापालिकेवर टाकली आहे. पुणे वेगाने वाढत आहे. शहराच्या आजूबाजूलाही त्याची वाढ होत आहे. तेथे मोठे गृहनिर्माण प्रकल्प झाले आहेत. सदनिका बांधून तयार आहेत. पण, तेथे टॅंकरने पाणी पुरवठा होत आहे. त्यासाठी तेथील नागरिकांना पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे “पीएमआरडीए’च्या सुमारे 7 हजार चौरस किलोमीटर परिसरात पाण्याचे नियोजन आत्तापासूनच करावे लागेल. हे नियोजन करताना फक्त खडकवासला धरणातून पाणी पुरवठा केला जाणार नाही. तर, तो “पीएमआरडीए’च्या हद्दीतील त्या-त्या भागातील धरणांमधून केला जाणार आहे.

पुण्यात औद्योगीकीकरण वेगाने वाढत आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या संख्येने लोक पुण्यात येणार आहे. त्यासाठी “पीएमआरडीए’चा विकास केला जात आहे. त्यांना तेथे रस्ते देता येतील. पाणी हा असा स्रोत नाही की, पैसे देऊन ते उपलब्ध करता येईल. पडणाऱ्या पावसातून मिळणाऱ्या पाण्याचा प्रभावी नियोजन त्यासाठी झाला पाहिजे, असेही बापट यांनी सांगितले

पाणीसाठा वाढविण्यासाठी नियोजन
तलावातील गाळ काढणे
कालवे, धरणांची दुरुस्ती करणे
बंद नळातून पाणी पुरवठा करणे
साठवण क्षमता वाढविणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)