“पीएमआरडीए’ मेट्रो आता महत्त्वाकांक्षी प्रकल्प

पुढील प्रशासकीय कामे तातडीने मार्गी लागण्याची आशा

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला शासनाने “महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प’ म्हणून घोषित केले आहे. हा मेट्रो प्रकल्प “पीपीपी’ अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलद्वारे राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी मेट्रो मार्गालगत सुमारे 30 ते 35 हेक्‍टर जागेची आवश्‍यकता भासणार आहे. शासनाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प घोषित केल्यामुळे भूसंपादन, निधी आणि आवश्‍यक ती मंजुरी मिळण्याची कामे तातडीने होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे पीएमआरडीएची मेट्रो प्रकल्प लवकर मार्गी लागणार आहे.

-Ads-

हिंजवडी येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी “पीएमआरडीए’ने हिंजवडी ते शिवाजीनगर असा 23 किलोमीटरचा प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच “बांधा, संकल्पन करा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तातंरीत करा’ या तत्वावर उभारण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता मिळालेली आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्प “पीएमआरडीए’, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ या चार संस्थांच्या हद्दीतून जात आहे. मेट्रोच्या स्टेशनसाठी मेगापोलीस सर्कल, इन्फोसिस फेज 2, विप्रो टेक्‍नोलॉजी फेज 2, शिवाजीचौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडीयम, निकमार्क, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेरगाव, पुणे विद्यापीठ, आरबीआय, कृषी विदयापीठ, शिवाजीनगर या ठिकाणी मेट्रोचे स्टेशन उभारले जाणार आहे. त्याचबरोबर कारडेपोसाठी माण (ता.मुळशी) येथील जागेची आवश्‍यकता आहे.

याविषयी आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी राज्य शासन व केंद्र शासनाच्या ताब्यातील आवश्‍यक त्या जमिनीचा ताबा मिळावा, यासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले जाणार आहे. शासनाने निकडीचा प्रकल्प जाहीर झाल्याने आवश्‍यक असलेल्या जागाचा आगाऊ ताबा जिल्हाधिकारी यांच्याकडून “पीएमआरडीए’ला देता येईल. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होईल व सदर प्रकल्प मार्गी लागण्यास चालना मिळेल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)