पीएमआरडीए बांधकाम नियमावली अंतिम मंजुरीसाठी लवकरच शासनाकडे

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हद्दीसाठी तयार केलेल्या नियमावलीवर दाखल हरकती व सूचनांवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच नियमावली अंतिम करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पीएमआरडीएकडून हद्दीसाठी बांधकाम नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीवर प्राधिकरणाकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर शंभर हून अधिक नागरिकांनी हरकती दाखल केल्या होत्या. नियमावलीत इमारतींची उंची 50 मीटरपर्यंत ठेवण्यास आणि रस्तारूंदीनुसार टीडीआर वापरण्याची तरतूद करण्यात आली होती. इमारतींच्या उंची 50 मीटरपर्यंतची मर्यादा ठेवण्यावर सर्वाधिक हरकती दाखल झाल्या होत्या. त्यावरील सुनावणीची कार्यवाही नुकतीच पूर्ण करण्यात आली.

प्राधिकरणाच्या हद्दीत अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे 50 मीटरपेक्षा अधिक इमारती बांधण्यास परवानगी दिल्यास आणि एखादी दुर्घटना घडल्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे इमारतींच्या उंचीवर मर्यादा घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राधिकरणाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. तो पूर्ण झाल्यानंतर त्यासोबत करण्यात येणाऱ्या बांधकाम नियमावलीमध्ये इमारतींच्या उंची वाढविण्यावर असलेली मर्यादेचा विचार करता येऊ शकतो, असे सांगण्यात आले.

येत्या आठवडाभरात ही नियमावली अंतिम करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून त्यास मान्यता मिळाल्यानंतर त्या नियमावलीच्या आधारे प्राधिकरणाच्या हद्दीत बांधकामांना परवानगी देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)