‘पीएमआरडीए’च्या मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान यांच्या हस्ते?

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्‍यता आहे.

पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा येत्या मंगळवारी (दि.18) प्रस्तावित आहे. बालेवाडी स्टेडियम येथे हा कार्यक्रम प्रस्तावित असून या दौऱ्याच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी यांनी येत्या शुक्रवारी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या कार्यरत आहेत. या ठिकाणी दैनंदिन कामकाजासाठी सुमारे दोन लाख नागरिक येत असतात. वाहतुक कोंडीमुळे अनेक कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर “पीएमआरडीए’ने हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे हिंजवडी येथील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग 23.3 किलोमीटर लांबीचा असून एकूण 23 स्थानके असणार आहे. हा प्रकल्प राज्य शासनाने 18 जुलै 2018 रोजी महत्त्वकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. देशातील पहिला मेट्रोचा सार्वजनिक खासगी भागीदारीतील प्रकल्प असणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचे काम टाटा -सिमेन्स या कंपनीला देण्यात आले आहे.

यापूर्वीच्या मार्गांचेही उद्‌घाटन मोदींच्या हस्ते
यापूर्वी पिंपरी व पुणे महानगरपालिकेच्या दोन मार्गांच्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आता शहराच्या तिसऱ्या मार्गाच्या मेट्रोचे भूमिपूजनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. दि.18 डिसेंबर 2018 रोजी पंतप्रधान मोदी यांचा दौरा प्रस्तावित असल्याने जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीमध्ये सुरक्षा व्यवस्था, कार्यक्रम स्थळ, राजशिष्टाचार या सर्व बाबींचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)