पीएमआरडीएची अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील सर्वे नंबर 104/19 मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून 4 हजार 500 चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त केले. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966च्या कलम 53 (1) अन्वये संबधिताना प्रत्येकी दोनदा नोटीसा देऊनही त्यांनी अनधिकृत बांधकामे सुरू ठेवली होती.

सदरील बांधकामाचे क्षेत्रफळ हे एकूण 4509 चौरस फूट आरसीसी स्वरूपात चार मजली स्वरूपातील हे बांधकाम होते. पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाईवेळी पीएमआरडीएचे पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, उपअभियंता राजेंद्र मेदनकर, उपअभियंता सुर्यकांत कापसे, हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या बंदोबस्ताच्या नियंत्रणाखाली कारवाई पार पाडण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)