पीएमआरडीएचा छोट्या प्लॉटधारकांना दिलासा

ओपन, ऍमिनिटी स्पेसचे बंधन वगळले


बांधकाम नियमावलीला शासनाची मान्यता

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) बांधकाम नियमावलीस नुकतीच शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये वीस गुंठ्यांच्या आतील छोट्या प्लॉटधारकांना 15 टक्के सुविधा क्षेत्र (ऍमेनिटी स्पेस) आणि 10 टक्के मोकळी जागा (ओपन स्पेस) ठेवण्याचे बंधन नियमावलीत वगळण्यात आले आहे. त्यामुळे छोट्या प्लॉटधारकांना दिलासा मिळाला आहे.

पीएमआरडीएची बांधकामनियमावली नागरिकांच्या हरकती सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नियमावलीत छोट्या प्लॉटधाराकांनासाठी अनेक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. यापूर्वी महापालिकेच्या हद्दीत केवळ या सवलती होत्या. परंतु, आता दोन्ही महापालिकांच्या हद्दीलगत आणि प्राधिकरणाच्या सात हजार चौरस किलोमीटरच्या हद्दीत या सवलती लागू झाल्या आहेत. यापूर्वी जमीन विकसित करण्यासाठी घेतल्यानंतर त्यावर नियमानुसार 15 टक्के ऍमेनिटी स्पेस आणि 10 टक्के ओपन स्पेस ठेवण्याचे बंधन होते. त्यामुळे वीस गुंठ्यांच्या आतील प्लॉटधारकांना बांधकाम करणे अवघड झाले होते. त्यामुळे अशा प्लॉटधारकांना ऍमेनिटी स्पेस आणि ओपन स्पेसमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी नागरी हक्क संस्थेचे सुधीर कुलकर्णी यांनी केली. त्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येत होता.

प्राधिकरणाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमावलीत वीस गुंठ्यांच्या आत क्षेत्रफळ असलेल्या प्लॉटधारकांना टीडीआर देखील लागू करण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी नऊ मीटर रुंदी असलेल्या प्लॉटधारकांना त्याचा वापर करता येणार आहे; तर वीस गुंठ्यांच्यावर आणि चाळीस गुंठ्यांच्या आतील प्लॉटधारकांना दहा टक्के ओपन स्पेसचे बंधन कायम ठेवण्यात आले आहे. तर, ऍमेनिटी स्पेस ठेवण्याचे बंधन काढून टाकताना अशा प्लॉटधारकांना मात्र 0.85 टक्के एफएसआय वापरण्यास परवानगी देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

* वीस गुंठ्यांच्या आतील प्लॉटधारकांना ऍमेनिटी व ओपन स्पेस ठेवण्याच्या बंधनातून वगळले.
* प्लॉटची गुंठेवारी झालेली नसेल, तर 0.75 टक्केच एफएसआय मिळणार
* गुंठेवारी झाली असेल, तर 1.10 एफएसआय मिळणार
* गुंठेवारी अथवा गुंठेवारी न झालेल्या परंतु नऊ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यावर अशा प्लॉटधारकांना टीडीआर वापरता येणार

छोट्या प्लॉटधारकांसाठी ओपन स्पेस आणि ऍमिनिटी स्पेस ठेवण्याचे बंधन वगळण्यात आले आहे. त्यामुळे छोट्या प्लॉटधारकांना दिलासा मिळाला आहे. ओपन आणि ऍमिनिटी स्पेस ठेवण्याच्या अटीमुळे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत होती. या नवीन बांधकाम नियमावलीत ही अट वगळण्यात आल्याने अधिकृत बांधकाम करण्याकडे नागरिक वळतील. – सुधीर कुलकर्णी, नागरी हक्क समिती


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)