पीएफची रक्कम न भरल्याने कंपनीविरोधात गुन्हा दाखल

पाचगणी – पाचगणी येथील ताराचंद लेबर कॉन्ट्रॅक्‍टरचे मालक रुपेश ताराचंद चव्हाण यांनी कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम न भरल्याप्रकरणी त्यांच्यावर पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालय (कोल्हापूर)चे अंमलबजावणी अधिकारी गोपाळ जोशी यांनी आयुक्त प्रसाद व सहाय्यक आयुक्त श्रीवर्णवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

याबाबत माहिती अशी, कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम दरमहा पंधरा तारखेच्या आत क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयात ऑनलाईन चलनाद्वारे भरणा करणे आवश्‍यक असते. परंतु, रुपेश ताराचंद चव्हाण यांनी डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 व एप्रिल 2017 ते नोव्हेंबर 2017 याकालावधीतील रक्कम अंदाजे रुपये 3 लाख 12 हजार भविष्य निर्वाह निधी कार्यालयात ऑनलाईन चलनाद्वारे जमा केले नाहीत. याबाबत क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून लेखी सुचना व कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तरीही रकमेचा भरणा करण्यात आला नाही. त्यामुळे
त्यांच्या विरोधात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व प्रकिर्ण उपबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)