पीएनबी हेरांची मदत घेणार

थकबाकीदार शोधण्यासाठी प्रयत्नात वाढ

नवी दिल्ली, दि.25-पंजाब नॅशनल बॅंक म्हणजे पीएनबी गायब झालेल्या थकबकीदारांना शोधण्यासाठी काही प्रमाणात हेरांची मदत घेणार आहे. त्यांच्या नियुक्‍तीसाठी बॅंकेने काही दिवसापुर्वी अर्ज मागविले आहेत.

बॅंकेच्या वसूल न झालेल्या कर्जाची रक्‍कम 57519 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. बॅंकेला यातून लवकर मार्ग काढायचा आहे. त्यामुळे बॅंकेने अनेक पातळ्यावर कर्जवसुलीसाठी आक्रमक मोहीम राबविली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बॅंक आता कर्ज घेऊन गायब झालेल्या थकबाकीदारांचा माग काढण्यासाठी हेरांची मदत घेणार आहे.

त्याचबरोबर बॅंकेने अगोदरच गांधीगिरी मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत बॅंकेचे कर्मचारी कर्ज परत न करणाऱ्याच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी शांतपणे बसून राहतात. यातून बॅंकेला महिन्याला 150 कोटी रुपयांच्या कर्जाच्या वसुलीची अपेक्षा आहे.

आता बॅंक हेराची मदत घेउन गायब झालेल्यांचा, त्यांची हमी घेतलेल्यांचा देशात आणि परदेशात शोध घेणार आहे. त्याचबरोबर ते सध्या काय करतात. त्याच्या कोणता व्यवसाय चालू आहे. त्यांचे कोणत्या बॅंकेते खाते आहे. याचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी नियुक्‍त केलेल्या हेरांना 60 ते 90 दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे.

नीरव मोदी प्रकरणानंतर बॅंकेने आपला ताळेबंद स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतलेली आहे. या प्रकरणातून सहज बाहेर येईल, असे पीएनबीने या अगोदर स्पष्ट केले आहे. नवे तंत्रज्ञान स्वीकारून पीएनबी अनुत्पादक मालमत्ता कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)