पीएनबी बँकेकडून व्याजदरात वाढ करण्याची घोषणा

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बँकेत खाते असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएनबी बँकेकडून विविध कालावधींच्या १० कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिटवरील व्याजदरात १.२५ टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा करण्यात आली असून, नवे व्याजदर एक जानेवारीपासून लागू होणार असल्याची माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली.

बँकेच्या माहितीनुसार, एक कोटी रुपयांच्या रकमेसाठी ७ ते २९ दिवसांच्या डिपॉझिटवरील व्याजदर ४ टक्क्यांवरुन  ५.२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. याप्रमाणेच ३० ते ४५ दिवसांच्या डिपॉझिटवरील व्याजदर ४.५० टक्क्यांवरुन ५.२५ टक्के करण्यात आले आहेत.

बँकेच्या नव्या व्यजदरानुसार ४६ ते ९० दिवसांच्या डिपॉझिटवर ६.२५ टक्के, ९१-१७९ दिवसांच्या डिपॉझिटवर ६.२५ टक्के, तर १८८ ते ३४४ दिवसांच्या डिपॉझिटवर पाच टक्के व्याजदर देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)