पीएनबी घोटाळा : मेहुल चोक्सीच्या सहकाऱ्याला अटक 

कोलकता – पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून विदेशात पळालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या एका सहकाऱ्याला अटक करण्यात अंमलबजावणी संचलनालयाला यश आले आहे. दीपक कुलकर्णी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दीपक कुलकर्णी आज सकाळी हॉंगकॉंगहुन परतातच कोलकता विमानतळावर त्याला अटक करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंगळवारी दीपक कुलकर्णी याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. या गुन्ह्याची मुंबईत तक्रार दाखल असल्याने दीपक कुमारची ट्रान्झिट रिमांड घेऊन मुंबईत आणण्यात येईल, असे ईडीकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)