पीएनबीला सरकारच्या मदतीची अपेक्षा 

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून 5,431 कोटी रुपयांचे भांडवली समर्थन मागण्यासाठी पंजाब नॅशनल बॅंकेचे (पीएनबी) संचालक मंडळ चर्चा करणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी भांडवली समर्थन मागितल्यास त्यावर विचार केला जाईल. त्यानंतर पंजाब नॅशनल बॅंकेने यावर विचार करण्यास बैठक बोलाविली आहे. या बैठकीत 5,431 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर जारी करण्याबाबत विचार करण्यात येईल. तसेच, शेअरधारकांची मंजुरी घेण्यास बैठक आयोजित करण्याची तारीख निश्‍चित करण्यात येईल. पीएनबीने या बैठकीची माहिती स्टॉक एक्‍स्चेंजला दिली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)