पीएनबीने नीरव मोदीविरोधात ठोठावले हाँगकाँग न्यायालयाचा दरवाजा

नवी दिल्ली : कोट्यावधी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीच्या विरोधात पंजाब नॅशनल बँक हाँगकाँग न्यायालयात पोहोचले आहे. याचबरोबर नीरव मोदी आणि मेहुल चोकसी याच्या मालमत्ता आणि व्यवसाय असणाऱ्या सर्व देशांमध्ये बँक न्यायालयीन कारवाई सुरू करणार आहे.

नीरव मोदी सध्या हाँगकाँगमध्ये वास्तव्यास आहे. भारत सरकारने त्याच्या प्रत्यार्पणासाठी हाँगकाँग प्राधिकरणाकडे अर्ज देखील केला आहे. पीएनबीची 13500 कोटी रुपयांची फसवणूक करणारा हिरेव्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी या दोघांचा अनेक देशांमध्ये व्यवसाय तसेच मालमत्ता असल्याचा दावा होतोय. ईडीने दोघांच्या मालमत्ता जाणून घेण्यासाठी 13 देशांच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला आहे. सिंगापूर, दक्षिण आफ्रीका, ब्रिटन, दुबई, अमेरिका, बेल्जियम, रशिया, फ्रान्स, चीन आणि हाँगकाँगला ईडीने विनंतीपत्र पाठवले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)