पीएनजी ज्वेलर्सचा सुप्रसिध्द मंगळसूत्र महोत्सव

नगर – 185 वर्षांची परंपरा असलेल्या पीएनजी ज्वेलर्सतर्फे 24 जुलै ते 24 ऑगस्ट या एक महिन्याच्या कालावधीत मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवकाळात पीएनजी ज्वेलर्स मंगळसूत्रांची एक्‍सक्‍लुझिव्ह श्रेणी सादर करणार आहे.

आजच्या काळात भारतीय विवाहित महिला पारंपरिक, तसेच आधुनिक दागिना असलेले मंगळसूत्र वापरतात. हा दागिना म्हणजे पती-पत्नीच्या नात्याचे प्रतीक आहे. मंगळसूत्र हे स्त्रीचे प्रेमाचे, विवाहित असल्याचे प्रतीक असून ते स्त्रीमधील एकनिष्ठता, आत्मविश्वास दर्शविते. यंदाच्या वर्षी प्रामुख्याने मंगळसूत्रांचे प्रकार वजनाला हलके त्याचबरोबर पारंपरिक डिझाईन्ससुध्दा असणार आहेत. या महोत्सवकाळात भारतभरातील सर्व पीएनजी ज्वेलर्सच्या दालनांमध्ये आकर्षक अशा वैविध्यपूर्ण नवीन डिझाईन्स पहायला मिळतील. या आकर्षक योजनेंतर्गत डायमंड मंगळसूत्र पेंडंटच्या घडणावळीवर फ्लॅट 70 टक्के सवलत मिळणार आहे. तसेच, सोन्याच्या मंगळसूत्रांच्या घडणावळीवर 30 टक्केपर्यंत सवलत देण्यात येणार आहे.

याप्रसंगी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी, मंगळसूत्र महोत्सव हा नेहमीच भारतभरातील सर्व पीएनजी ज्वेलर्सच्या दालनांमध्ये लक्षणीय महोत्सव ठरला आहे. हा पीएनजी ज्वेलर्स प्रस्थापित वार्षिक उपक्रम आहे. या महोत्सवात आम्हास नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो आणि आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या गरजा लक्षात घेता नेहमीच नावीन्यपूर्ण डिझाईन्स सादर करत असतो, असे सांगितले.

पीएनजी ज्वेलर्सच्या देशभरात 22 शाखा असून, या सर्व ठिकाणी हा मंगळसूत्र महोत्सव सध्या सुरू आहे. त्याबरोबरच अमेरिका आणि अरब अमिरातीतील तीन शाखांमधूनही पीएनजीच्या एक्‍सक्‍लुसिव्ह डिझाईन्सना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)