पीएच. डी. प्रवेशासाठी गुणांची पात्रता घटविली

पुणे – पीएच. डी. आणि एम. फिल. अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या पात्रतेत अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 5 टक्‍के गुणांची सवलत देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला आहे. त्यामुळे आता पीएच. डी. व एम. फिल. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गुणाची पात्रता 50 टक्‍क्‍यांहून 45 टक्‍के झाली आहे. या निर्णयाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच. डी. व एम. फिल. प्रवेश परीक्षा अर्थात पेट परीक्षेत विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे.

राखीव प्रवर्गासह अपंगांनाही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 5 टक्‍के गुणांची सवलत जाहीर करण्यात आली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि दिव्यांगांसाठी प्रवेश प्रक्रियेत राखीव जागांवर अनेकदा पुरेसे उमेदवार न मिळाल्याने जागा रिक्‍त राहतात. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया संपल्यावर एक महिन्याच्या आत प्रवेशासाठी विशेष मोहीम आखण्याची सूचनाही यूजीसीने दिली आहे. तसेच, राखीव प्रवर्गाच्या अधिकाधिक जागांवर प्रवेश होण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने पावले उचलण्याची आवश्‍यकता असल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यूजीसीच्या नव्या निर्णयाची प्रवेश परीक्षेत अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)