पीएचडी प्रवेश परीक्षेस अर्ज करण्यास मुदतवाढ

 

पुणे – मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षांचे निकाल लांबल्याने सावित्रीबाई फुले पुुणे विद्यापीठाच्या एमफिल व पीएचडी प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी आता दि. 21 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.

विद्यापीठाच्या विविध विभागातील एमफिल व पीएचडीच्या रिक्‍त जागा जाहीर करण्यात आल्या. या रिक्‍त जागांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत दि. 14 ऑगस्ट पर्यंत होती. पीएचडी प्रवेश परीक्षा दि. 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. आतापर्यंत सुमारे 10 हजार 500 विद्यार्थ्यांनी एमफिल व पीएचडी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केले असून, त्यातील सहा हजार 500 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

पुणे विद्यापीठाच्या एमफिल व पीएचडी प्रवेशासाठी राज्यातील विद्यापीठासह देशभरातील शिक्षणसंस्थांतील विद्यार्थी अर्ज करतात. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देणे आवश्‍यक आहे. मात्र मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्यामुळे विविध विषयांचे निकाल अद्याप जाहीर झाले नाहीत. त्यामुळे पुणे विद्यापीठाने एमफिल व पीएचडी प्रवेशासाठी अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती पुणे विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)