पिस्तूल बाळगणाऱ्याच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे – पिस्तूल बाळगणाऱ्याच्या पोलीस कोठडीत दि. 20 ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मतकर यांनी दिला आहे. त्याच्याकडून स्वारगेट पोलिसांनी दोन देशी बनावटी, एक गावठी, असे तीन पिस्तूल आणि बारा जिवंत काडतुसे जप्त केली होती.

रोहिदास ऊर्फ पिंट्या लक्ष्मण गुप्ते (वय 35, रा. डॉयसप्लॉट, गुलटेकडी), असे पोलीस कोठडीत वाढ केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक हर्षल चंद्रकांत दुडम यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कारवाई करत 13 ऑगस्ट रोजी दुपारी 1.35 च्या सुमारास डायसप्लॉट, गुलटेकडी येथून अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याने पिस्तूल कोठून आणले, याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील संदीप दीक्षित यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)