देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या एका परप्रांतीय युवकाला पोलिसांनी राजेंद्रनगर भागात पकडले. त्याच्याकडून पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी सोनू धरवेंद्र राजपूत (सध्या, रा. लोहगाव, मूळ रा. शिवनी, जयपूर, राजस्थान) याला अटक करण्यात आली. राजपूत राजेंद्रनगर भागातील सचिन तेंडूलकर र्जॉंगग पार्क परिसरात येणार असल्याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक बाबा दांगडे आणि चेतन शिरोळकर यांना मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा लावून त्याला पकडले. त्याच्या ताब्यातून पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. राजपूत पिस्तुल विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमृत मराठे, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, दांगडे, शिरोळकर, संजय बनसोडे, सचिन जगदाळे यांनी ही कारवाई केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)