पिस्तूलप्रकरणी दोघे गजाआड

पिंपरी – बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्या दोन जणांना भोसरी एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टीत करण्यात आली.

लखनकुमार गायकवाड (वय-25), जमीर उर्फ अब्दुल शेख (वय-43, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

लखन गायकवाड याच्याकडे एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून लखनला जेरबंद केले. त्याच्याकडे 60 हजार 400 रूपये किमतीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. चौकशी केली असता जमीरने त्याला पिस्तूल विक्री केल्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार, जमीरलाही अटक करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)