पिस्तूलप्रकरणी तरुणास अटक

पिंपरी – पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. ही घटना मोशी येथे शुक्रवारी सायंकाळी घडली.

मोहन सुभाष कोळी (वय-21, रा. सिद्धी आर्केड मागे, माणिक चौक, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कर्मचारी नवनाथ पंडीत पोटे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोळी हा शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास मोशी येथील इंद्रायणी हॉटेलच्या समोर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून त्यास अटक केली. त्याच्याकडून 30 हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत केली. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)