पिस्तूलप्रकरणी तरुणाला अटक

पिंपरी – देशी बनावटीचे पिस्तुल आणि एका जिवंत काडतुसासह तरुणाला भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहा समोरुन अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (दि. 3) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने केली.

रोहन सहदेव पाषणकर (वय-23, रा. नांदे म्हाळुंगे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात अवैधरित्या पिस्तुल बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी गुन्हे शाखा युनिट 1 मधील पोलीस शिपाई सचिन मोरे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की, एका तरुण भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोर पिस्तूल घेऊन उभा आहे. यावर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून रोहन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळले. पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)