पिस्तुल बाळगणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद

शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई

पुणे- पिस्तुल बाळगणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट 1 च्या पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे असा 50 हजार 150 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सनी ऊर्फ प्रशांत प्रकाश कोलते (वय 23, रा. सुखसागरनगर, साईनगर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा तपास डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीत करत होते. त्यावेळी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दळवी रुग्णालयाच्या समोरच्या गल्लीतील सार्वजनिक रस्त्यावर एक व्यक्ती पिस्तुल घेऊन उभारली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांना समजली. त्यावेळी त्यांनी स्वत: पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने कारवाई करत कोलते याला जेरबंद केले. अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, पोलीस शिपाई तुषार माळवदकर, पोलीस हवलदार रिजवान जिनेडी, प्रकाश लोखंडे, उमेश काटे, महेबुब मोकाशी, राजू पवार, अशोक माने, पोलीस नाईक सचिन जाधव, इम्रान शेख, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, सुधाकर माने, तुषार खडके, सुभाष पिंगळे, गजानन सोनूने आणि प्रशांत गायकवाड यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)