पिसोरे खांडमध्ये आईची चिमुकलीसह आत्महत्या

आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट

श्रीगोंदा – तालुक्‍यातील पिसोरे खांड येथील रहिवासी महिला श्‍यामल गणेश येरकळ (वय 26) हिने दोन वर्षांच्या मुलीसह विष घेऊन आत्महत्या केली.
आराध्या गणेश येरकळ असे मृत चिमुकलीचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. श्‍यामल गणेश येरकळ ही महिला पती गणेश सोन्याबापू येरकळ, मुलगी आराध्या व चार महिन्यांची मुलगी यांच्यासह पिसोरे खांड येथे राहत होती.

गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास श्‍यामल येरकळ यांचे नातेवाईक खबर देणारे बाबा शितोळे यांना श्‍यामल हिने विष घेतल्याची माहिती समजली. त्यांनी पिसोरे खांड येथे येऊन पाहिले तर श्‍यामल ही मयत झाली होती. तर तिची दोन वर्षांची मुलगी आराध्या ही बेशुद्ध होती. शितोळे यांनी तिला तत्काळ उपचारासाठी श्रीगोंद्याला दवाखान्यात आणले. परंतु, डॉक्‍टरांनी आराध्या मृत झाल्याचे सांगितले. या घटनेबाबत बाबा सोपान शितोळे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. उशिरापर्यंत श्रीगोंदा पोलिसांत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)