पिसाळलेल्या कुत्र्यांची नीरा शहरात दहशत

नीरा- नीरा शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत असून शनिवारी लहान मुलांसह आठ जणांना गंभीर चावा घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. जखमींना तातडीने नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी टी रैबिजचे इंजेक्‍शन देउन पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात रवाना केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने आरोग्य व वनविभागाची मदत घेऊन मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
शनिवारी सकाळपासून लहान मुलांसह अनेकांना पिसाळलेल्या कुत्र्यांच्या दहशतीला सामोरे जावे लागले. शहरातील तीन वर्षांचा चिमुरडा समवेत दोन महिला व पाच पुरूषांना कुत्र्यांनी चावा घेतला. यापैकी तीन वर्षांच्या चिमुरड्याला दुपारी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शाहू भरत जाधव (वय 3 वर्ष) निंबूत या चिमुरड्याचा गंभीर चावा घेतला. दुपारनंतर अलका किसन जाधव (वय 40), राजू गुलाब नलवडे (वय 25), कोमल मारूती सोनवणे (वय 58), गजानन संपत पोकळे (वय 29), प्रवीण चंद्रकांत मेमाणे (वय 39), हुसेन बासू शेख (वय 18), अमोल गायकवाड व अतुल दगडेला चावा घेतला. सर्व 9 जखमींवर नीरेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. तसेच त्यांना टी रैबिजचे इंजेक्‍शन देण्यात आले आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
नीरा परिसरातील नागरिकांना नेहमी भटक्‍या कुत्र्यांच्या उच्छादाला सामोरे जावे लागते. मच्छी मार्केट, शिवाजी चौक, बुवासाहेब चौक परिसरात संध्याकाळी दुचाकी स्वारांवर कुत्र्यांचे टोळके धावून जाते. यामुळे अनेकदा जीव मुठीत घेऊनच दुचाकीस्वारांना वाहन चालवावे लागते. तसेच अरूंद गल्लीत टोळक्‍याने भटकी कुत्री बसलेली असतात. त्यामुळे मुलांना घाबरतच शाळेत जावे लागते. जिल्हा परिषदेची मुलांची व मुलींची अशा दोन शाळा आणि अंगणवाडी बाजरतळाजवळ असल्यामुळे मुले शाळेत जाण्यासाठी घाबरत आहेत. मागील चार महिन्यांत जवळपास 130 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे संबंधितांना टी रैबिज इंजेक्‍शन देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने आरोग्य व वनविभागाची मदत घेऊन मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)